शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

नितीन आगे जातीय द्वेषातून झालेले हत्याकांड - मिलिंद सुर्वे




नफ च्या वतीने जिल्हाभरात एकदिवशीय धरणे आंदोलन
नितीन आगे जातीय द्वेषातून झालेले हत्याकांड - मिलिंद सुर्वे
वाशीम - राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ) च्या वतीने जिल्हयातील वाशीम, कारंजा, मानोरा, रिसोड, मालेगाव  या तालूक्यातील आणि जिल्हाधिकारी कार्यालय समोर राज्यात अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुक्त जातीवर होणार्‍या अन्याय अत्याचार आणि असंविधानिक शोषणाविरुद्ध 15 डिसेंबर रोजी एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
     निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्रात मागील काही वर्षात नि. जाती/ नऊ.जमाती, भटक्या विमुक्त जमाती यांच्यावर तसेच यांच्यातील सरकारी कर्मचारी तसेच महिला यांच्यावर सतत अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे देशात दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये 2011 ते 2 सप्टेंबर 2017 या सहा वर्षात 14971 तक्रारी नोंद झालेल्या आहेत. यापैकी 60 टक्के घटनांच्या तक्रारीची नोंदही होत नसल्याचे दिसून येते. यामध्ये मनोज कसाब जालना, माणिक उदागे पुणे, प्रियांका भोतमांगे खैरलांजी, सागर शेजवळ शिर्डी अशा एकूण 11 गंभीर घटना नमूद केल्या आहेत.
     जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनादरम्यान बोलतांना नफचे जिल्हाध्यक्ष मिलींद सूर्वे म्हणाले की, नितीन आगे हत्याकांड हे जातीय द्वेषातून झालेले आहे. 28 एप्रिल 2014 रोजी नितिन आगे यांना कॉलेजमधून बाहेर काढून कॉलेजच्या आवारात समाज कंटकाकडून जिवघेणी मारहाण करण्यात आली. त्याच्या मारहाणीचे साक्षीदार असंख्य विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेचे अन्य कर्मचारी होते. 23 नोव्हेंबर 2017 रोजी या निर्घृण हत्येच्या प्रकरणाचा मनाला चिड आणणारा निकाल लागला. या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटलेच कसे ? असा सवाल निवेदनाव्दारे सरकारला विचारण्यात आला आहे.
    जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या या एकदिवशीय धरणे आंदोलनात नफ जिल्हाध्यक्ष मिलिंद सुर्वे, तालुका अध्यक्ष रवी तायडे, रिसोड तालूका अध्यक्ष गौतम वाकुडे, मालेगाव तालुका अध्यक्ष नारायण पडघन, मंगरुळपीर तालुका अध्यक्ष आनंद इंगोले, कारंजा तालुका अध्यक्ष दिनकर ठोके, मानोरा तालुका अध्यक्ष धर्मा सावळे, डॉ. रवी जाधव, भालेराव पाटील, प्रेमानंद आरखराव, धनंजय कांबळे, अजय सावळे, रवी अवताडे, निलेश तायडे, विशवनाथ इंगोले, दत्तराव वानखडे, भारत कांबळे, रमेश अंभोरे, लक्ष्मीबाई शेताणें, कायबाई पारस्कर, गीताबाई डोंगरे, प्रवीण पट्टेबहादूर, गणेश घुगे, विकास कांबळे आदींसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सम्राट टाईम्स

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा