शनिवार, १६ डिसेंबर, २०१७

राणी लक्ष्मीबाई शाळेत खरी कमाई सप्ताह उत्साहात संपन्न


सम्राट टाइम्स न्यूज
 आपणही दैनंदिन आवश्यक वस्तुंची निर्मीती करुन त्या विकुन चार पैसे कमावु शकतो , व आर्थिक स्वयंपुर्ण होउ शकतो, हे व्यावहारीक ज्ञान मिळावे म्हणुन स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत स्काऊट गाईडच्या वतीने खरी कमाईचे आयोजन करण्यात आले होते. दि. ११ ते १६ डीसेंबर  पर्यंत वर्ग ९  व  १० च्या विद्यार्थीनींनी आपली व्यावसायीक कला वृद्धिंगत केली.

यानिमीत्ताने व्यवहाराची जाणीव होणे ,वृद्धांची सेवा , परीसर स्वच्छता , वृक्ष संगोपन अशा कामांची जाणीव करुन देण्यात आली. विवीध घरगुती खाद्य पदार्थांची मधल्या सुट्टीत ७  ते  १० च्या विद्यार्थीनींना  विक्री करण्यात आली .

  सप्ताहाचे उद्घाटन मुख्याध्यापिका स्वाती कुळकर्णी यांनी केले . याप्रसंगी उपमुख्याध्यापक सुरेश खरावन , पर्यवेक्षिका शिला वजीरे उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे आयोजन गाईड विभाग प्रमुख शिक्षीका मंजुषा ठाकुर , सुनीता कुळकर्णी , योगीनी काळु , गीता यादव यांच्या मार्गदर्शनात झाले. या सप्ताहात सर्व शिक्षक , शिक्षीका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनींनी पुरेपुर आनंद घेतला .
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा