👉 विविध सामाजिक संघटनांचा पाठींबा
भारिप बहुजन महासंघ रिसोड शहराध्यक्ष प्रदीप खंडारे व उपाध्यक्ष आक्रमखान यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरमधील समाजमंदिराचे काम त्वरित करण्यात यावे.समाजमंदिर ते पंचशील चौक पर्यंत रस्त्याचे काम सुरू करावे, कामानीचे काम करावे या मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे
दि१३पासून सुरू झालेल्या उपोषणाला भीम टायगर सेना, खाटीक समाज संघटना,
रयत क्रांती सेना इत्यादी सामाजिक संघटनानी उपोषणाला पाठींबा दिला आहे. नगर परिषद समोर सुरू असलेल्या उपोषणाची दखल प्रशासनाने घ्यावी व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा करिता उपोषण कर्त्यांना अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी भेटी दिल्या.बाबुरावजी जुमडे, प्रमिला ताई शेवाळे,गिरीधर शेजुळ, ऍड दशरथ मोरे,ऍड तुरूकमाने,ऍड शरद मोरे,भारिप ता अध्यक्ष केशवराव सभादिंडे,माजी नगरसेवक शेख ख्वाजा, मन्नु ठेकेदार,
संध्याताई पंडित,भारत कांबळे मूनवर खत्री भाई, जहुर भाई इत्यादी सह अनेकांनी भेटी देऊन उपोषणाला पाठींबा दिला
महेंद्रकुमार महाजन
रिसोड प्रतिनिधी
9960292121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा