कारंजा तालुक्यातील नामांकित गाव म्हणून कामरगाव आहे. परंतु कामरगाव येथे अवैधरित्या वाहतूक चालू आहे. त्यामध्ये ऑटो रिक्षा , मोटार गाड्या , ट्रॅव्हल्स, या वाहनांची अवैध वाहतूक चालू आहे. बुधवार येथील आठवडी बाजाराचा दिवस आहे. त्या दिवशी लोक खेड्यावरून ऑटो ने बाजाराला येतात. पण ते त्या ऑटोमध्ये लटकून येतात. यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. ऑटोचालक आपल्या फायद्यासाठी जनतेच्या जीविताशी खेळत आहेत. परंतु याकडे ठाणेदार साहेब जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. बुधवारी बस स्टॅण्डवर ट्राफिक पोलीस हजर असताना सुद्धा ऑटोचालक भरगच्च ऑटो भरून लोक नेत असतात तरी सुद्धा पोलीस काहीच बोलत नाहीत याचे नेमके कारण काय याचे उत्तर कुणाकडेच भेटत नाहीये . यावर शासनाचे व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पण हि बाब जनतेच्या जीवावर बेतणारी आहे. याचे भान ठेवायला हवे.
विनोद नंदागवळी कामरगाव
मो. ९६७३९५४५१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा