वाशिम - महाराष्ट्रात जे सरकार आले ते बहुजन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे आले हे कोणीही विसरु नये. मंत्री होणे सोपे असते मात्र लोकनेत होणे खुप कठीण असते. गोपीनाथ मुंडे हे खर्या अर्थाने महाराष्ट्राचे लोकनेते आहेत असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. महादेव जानकर यांनी केले.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे पुण्यस्मरण समितीच्या वतीने मंगळवार, 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता स्थानिक शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधन व किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
त्यावेळी. ना. जानकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक बाबाराव मुसळे यांनी केले. व्यासपीठावर जि.प. सभापती विश्वनाथ सानप, उपविभागीय अधिकारी अभिजीत देशमुख, समाजकल्याण उपायुक्त सुनिल वारे, डॉ. सुभाष मुसळे, मालेगावचे तहसिलदार राजेश वझीरे, डॉ. जयश्री गुट्टे, डॉ. चंद्रकांत घुगे, देविदास गिते, डॉ. ज्ञानेश्वर नागरे, समाजसेवक लॉ. वसंतराव धाडवे, जि.प. सदस्या सौ. रत्नप्रभा घुगे, जि.प. सदस्य जगदीश घुगे, पं.स. सदस्य वसंतराव मुसळे, देविदास गिते, पं.स. सदस्य नंदु घुगे, माणिकराव गंगावणे, आसाराम जायभाये आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दिप प्रज्वलन व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सत्यपाल महाराजांनी आपल्या प्रबोधनपर कार्यक्रमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्या किर्तनातून त्यांनी बेटी बचाव बेटी पढाव, वृक्ष लावा वृक्ष जगवा, व्यसनमुक्ती, पाणी अडवा पाणी जिरवा, जलसंधारण, स्वच्छता, शौचालय आदी विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सत्यपाल महाराजांनी लहान मुलांना संस्कारीक पुस्तके व संत गाडगे बाबांची पुस्तके वितरीत केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दिलीप जोशी यांनी केले. आपल्या भाषणातून बोलतांना महादेव जानकर म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर.आर. पाटील यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राची अपरिमीत हानी झाली असून देशाचे सुध्दा नुकसान झाले आहे. महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केल्याची माहिती ना. जानकर यांनी दिली. स्व. मुंडे यांचे कार्य सदोदीत पुढे सुरुच ठेवणार असल्याची ग्वाही ना. जानकर यांनी दिली. प्रबोधन कार्यक्रमाला जिल्हाभरातून बहूजन समाजातील नागरीक व महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे पुण्यस्मरण समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
सम्राट टाइम्स न्यूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा