पिंप्री,खरबी,मसोला,पिंपळखूटा धोत्रा वासीयांची मागणी
मंगरूळपीर, दि. १५
यामुळे १२०० ते १५०० हेक्टर शेतजमिन बारामाही ओलीताखाली येवून ४-५ गावे दुष्काळ मुक्त करण्याकरिता मौजे पिंप्री शेत शिवारात अडाण नदीवर "बलून बंधारा" उभारावा. अशा आशयाचे निवेदन ग्राम पिंप्री, खरबी, मसोला, पिंपळखूटा, धोत्रा ग्रामवासियांनी आज दि. १५ रोजी तहसिलदार वैशाख वाहुरवाघ यांना दिले.
निवेदनात नमुद केल्या प्रमाणे, मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम पिंपळखूटा, मसोला, खरबी, पिंप्री धोत्रा, गणेशपुर या गावातीलशेत शिवारातून वाहते. या गावात पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी अडाण नदीवर अवलंबून राहावे. लागते. नदी उथळ झाल्याने पावसाळ्यात पाणी वाहून जाते. तसेच शेतात पाणी शिरून शेतजमिनीचे व पिकाचे अतोनात नुकसान होते. जानेवारी महिण्यापासून या गावात पाणी टंचाईच्या झळा पोहचतात. म्हणून पिंप्री शेत शिवारात अडाण नदीवर नव्याने निर्माण होणाऱ्या "बलून बंधारा" उभारण्यात आल्यास अंदाजे १२०० ते १५०० हेक्टर शेतजमीन बारामाही सिंचनाखाली येवू शकते. तसेच ही गावे कायम स्वरूपी दुष्काळमुक्त होवू शकतात. यामुळे चार हजार नागरीकांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघून दिलासा मिळू शकतो.
निवेदनावर जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी, पिंप्री- खरबी सरपंच पुरूषोत्तम ठाकरे, मसोला बु. सरपंच अनिल मुळे, पिंपळखूटा सरपंचा चंदाताई धोटे धोत्रा- गणेशपुर सरपंच राजेंद्र राऊत तसेच पिंप्री-खरबी येथील श्रीराम ठाकरे, देवीदास कांबळे, मुरलीधर ठाकरे, गौतम सोनोने, समाधान ठाकरे मसोला बु. येथील मधुकर मुळे, प्रकाश मुळे, राजेश खाडे, बाबाराव मुळे, भास्कर मुळे, रामेश्वर मुळे, रमेश मुळे पिंपळखूटा येथील भास्कर धोटे, मनोहर परंडे, प्रकाश परंडे धोत्रा येथील किशोर राऊत भगवान भगत, शंकर घाटे ह्यांच्या स्वाक्षऱ्या असून ते उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रतिलीपी केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे, आ. लखन मलिक, आ. राजेंद्र पाटणी, जलसंधारण सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक यांना पाठविण्यात आल्या.
______________________________
"बलून बंधारा" या जागी उत्तमरित्या यशस्वी होईल
-- कुळकर्णी
अडाण नदीवर या ठिकाणी पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र शासनाने पूर्वीच निर्गमीत केले आहे. त्यामुळे या ठिकाणी तांत्रीकदृष्ट्या "बलून बंधारा" पूर्णपणे यशस्वी होवू ही गावे "पाणीदार" होवू शकतात. तसेच सिंचनाचा अनुशेष दूर होण्यास मदत होईल. असे मत जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी व्यक्त केले. फुलचंद भगत मो.9763007835
__सम्राट टाईम्स लाईव्ह____________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा