नॅशनल युवा को आपरेटीव्ह सोसायटी अंतर्गत आगामी २०२० मध्ये जपान मधील टोकियो शहरामध्ये होणार्या आॅलम्पिक खेळात काॅर्पोरेट सोशियल रिस्पाँसिबिलीटी (सी. एस. आर ) च्या अंतर्गत गेल इंडिया व अॅग्लियन मेडल हन्ट कंपनी यांच्या सहकार्याने क्रीडा कार्यक्रम हाती घेतला आहे. गेल इंडीया स्पीड स्टार (spot ,screen,select, nurture ) या अंतर्गत आंतराष्र्टीय व राष्र्टीय स्तरावर प्राविण्य प्राप्त करु शकणारी ११ ते १७ वयोगटातील मूले व मुलींची जिल्हा,राज्य् ,राष्र्टीय स्तरावर निवड करण्यात येणार आहे . खेळाडुंच्या क्रीडा प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत करुन , आंरराष्र्टीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्यास सहकार्य करण्यात येणार आहे. याकरीता क्रीडा प्रकारातील १०० , २००, ४०० मीटर धावणे या प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
सदर योजनेचे तृतिय वर्ष आहे. महाराष्र्टातील ८ जिल्हांमध्ये जिल्हास्तरीय निवड चाचणी घेण्यात येणार आहे.यामध्ये शालेय अथवा शाळाबाह्य विद्यार्थि मुंबई , सांगली,कोल्हापुर, सोलापुर नाशिक,बीड ,अकोला व नागपुर यापैकी कोणत्याही ठीकाणी नाव नोंदवु शकतात. विदर्भातील विभाग स्तर स्पर्धा अकोला येथे मंगळवार १९/१२/२०१७ रोजी वसंत देसाई स्टेडीयम रेल्वे स्टेशन रोड येथे सकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडुंची निवड चाचणी २५ डिसेंबर २०१७ ते १५ जानेवारी दरम्यान शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे होणार. त्याकरीता वाशीम जिल्ह्यातील बहुतांश खेळाडुंनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य समन्वयक राजेश आढाव ,एन वाय सी एस जिल्हा समन्वयक विष्णु इढोळे राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशीम, महेश महल्ले नाना मुंदडा विद्यालय मालेगाव , चेतन शेंडे टेक्निकल यांनी केले आहे.
शारीरिक पात्रताः- ११ ते १४ वयोगट मुले मुले ( जन्म तारीख १/१/२००४ ते ३१/१२/२००६ )
१५ ते १७ वयोगट मुले मुली ( ज. ता. १/१/२००१ ते ३१/१२/२००३)
आवश्यक कागदपत्रे —मुळ जन्माचा दाखला/बोनाफाईड , आधार कार्ड व दोन फोटो ची आवश्यक असल्याची माहिती अमोल काटेकर यांनी दिली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा