सम्राट टाइम्स न्यूज
राज्यातील मॅट्रीकपूर्व आणि मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला असून, मागील आणि यावर्षीची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
या संदर्भात सदस्य सर्वश्री सुधाकर कोहळे, ॲङ गौतम चाबुकस्वार, श्रीमती संगीता ठोंबरे यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. त्याला लेखी उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री यांनी म्हटले आहे की, डिबीटी पोर्टल वर्कमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे या पोर्टल ऐवजी पहिल्या सत्राचा शिष्यवृत्तीचा लाभ पात्र विद्यार्थांच्या आधार संलग्न बँक खात्यावर देण्यात येत आहे. मागील आणि या वर्षाची शिष्यवृत्तीदेखील बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा