मंगळवार, २ जानेवारी, २०१८

पोलीस स्टेशन धनज आमने सामने वरली- मटका ला उधाण


कारंजा तालुक्यातील एक नामांकित गाव म्हणून प्रसिद्ध असलेले धनज बु. येथे पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच वरली - जुगार - मटका अश्या अवैध धंद्यांना उधाण आलेले आहे. पोलीस स्टेशन समोर हा प्रकार घडतो हि लाजिरवाणी गोष्ट आहे. पोलीस स्टेशन समोर हे अवैध धंदे चालविण्याची हिम्मत लोकांमध्ये नाही परंतु ठाणेदाराचा आशीर्वाद यांच्या पाठीशी असल्यामुळे या सगळ्या गोष्टींना ऊत येत आहे. सदर बाब हि पोलीस स्टेशन असलेल्या गावामध्ये घडता कामा नये परंतु घडत आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे मुळीच लक्ष नाही किंवा ते लक्ष घालू इच्छित नाहीत. अशी बाब समोर आली आहे. हे अवैध धंदे सदर दोन महिन्यापासून सुरु आहेत. ठाणेदाराला विचारणा केली असता आमच्या पोलीस स्टेशन अंतर्गत कोणताही अवैध धंदा सुरु नाही असे सांगण्यात येते. परंतु पोलीस स्टेशनच्या बाजूलाच अवैध व्यवहार चालू आहे. असे लक्षात आले. याकडे प्रशासनाने जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. आज दि. ०२-०१-२०१८ रोजी आमचे प्रतिनिधी पोलीस स्टेशनला गेले असता हा सर्व प्रकार लक्षात आला. ठाणेदाराने  कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. 
विनोद नंदागवळी मो. ९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा