मंगरुळपीर-राज्याचे माजी ऊपमुख्यमंञी यांना महाराष्ट सदन घोटाळ्याच्या आरोपाखाली चौकशी यंञनांनी चौकशीच्या नावाखाली बावीस महिन्यापासुन डांबुन ठेवलेले आहे,भुजबळ यांना तात्काळ सोडावे या मागणी आणी त्यांच्या समर्थनार्थ मंगरुळपीर येथे निदर्शने करन्यात आले.
देशातील बहूजन,पददलित आणी ओबीसिंचे नेते आणी राज्याचे माजी मुख्यमंञी छगन भूजबळ तथा नाशिकचे माजी खासदार समिर भूजबळ यांना महाराष्ट सदन घोटाळ्याच्या आरोपाखाली चौकशी यंञनेने डांबुन ठेवले आहे.भूजबळांना केवळ आकसापोटी डांबुन ठेवन्यात आल्याचा आरोप समाजबांधवांनी केला असुन भूजबळ यांचेवरील आरोप अद्यापपर्यत सिध्द झाले नसल्याने तरीही या बहूजनांच्या नेत्याला कारागृहात डांबुन ठेवले आहे हा त्यांच्यावरील अन्याय असल्याने सर्व भुजबळ समर्थकांनी मंगळवार दि.२ जाने रोजी येथील तहसिल कार्यालयासमोर निर्दशने केली आहे.तात्काळ छगन भूजबळ आणी समिर भूजबळ यांची कारागृहातुन मूक्तता करावी या मागणीचे निवेदन ऊपविभागिय अधिकारी व पो.स्टे.चे ठाणेदार यांना दिले.या निवेदनावर अखिल भारतिय समता परिषदेचे शहर प्रमूख बाळासाहेब काळे यांचेसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा