मंगरुळपीरः पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणार्या वाॅटरकप स्पर्धा 3 विषयी सर्व अधिकारी कर्मचारी व सन्माननीय ग्रामसेवक, तलाठी व कुषी सहाय्यक यांना विस्तृत माहीती व्हावी याकरिता , पाणी फाऊंडेशन व शासनाच्या वतीने दि 3 रोजी पंचायत समीती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
मंगरूळपीर तालुक्याची निवड झाली असून सत्यमेव जयते वाटर कप स्प र्धा 3 आपल्या व गावकर्याच्या सहकार्याने गावागावात यशस्वी करून यावर्षी चा 75 लाखाचा वाटर कप आपल्याला जिकायचा आहे. त्याकरिता स्पर्धेचे नियम व प्रश्ननावली समजून घेण्यासाठी व स्पर्धेदरम्यान कामे कशी करायची हे समजून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्री राजेश पारणाईक यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार श्री वैशाख वाहूरवाघ, बीडीओ खेरे व कुषी अधिकारी सचिन कांबळे, कुषी अधिकारी शेळके, यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. या सभेला पाणलोट मार्गर्दशक सुमित गोरले व जिल्हा समनव्यक संतोष गवळे हे मार्गरदशन करणार आहे. तरी सभेला सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन
पाणी फाऊंडेशन टीमने केले आहे
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा