वाशीम - मोबाईल चोरी प्रकरणात उत्कृष्ट तपास करणार्या सायबर विभागामधील पोलीस बांधवांच्या सत्काराचा कार्यक्रम 13 जानेवारी रोजी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक स्वप्ना गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या दालनात घेण्यात आला. पोलीस स्टेशनमध्ये दररोज मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी दाखल होतात. या तक्रारी सायबर विभागात गेल्यानंतर सायबर विभागामध्ये या तक्रारीची कसून चौकशी करुन प्रकरण संबंधीत पोलीस स्टेशनमध्ये पाठविल्यानंतर या मोबाईल चोरीचा तपास लावल्या जाते. अशाच एका प्रकरणामध्ये मोबाईल चोरीचा यशस्वी छडा लावल्याबद्दल सायबर विभागातील पोलीस निरिक्षक विष्णू पाटील डुकरे, पोलीस निरिक्षक बावणकर, पोलीस नाईक प्रदीप डाखोरे, पोलीस शिपाई अमोल काळमुुंदळे, दिपक घुगे, प्रशांत चौधरी, महिला पो.कॉ. कोमल गाडे, वर्षा बांगड आदी पोलीस बांधवांचा पत्रकार संदीप पिंपळकर, सौरभ गायकवाड, काशीनाथ कोकाटे यांच्या हस्ते गौरवपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पिंपळकर यांनी सायबर विभागातील अधिकारी, कर्मचार्यांसह शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पाटकर व सर्व पोलीस बांधवांचे आभार मानले.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा