मंगळवार, ९ जानेवारी, २०१८

पाणी टंचाई गावाजवळील खाजगी विहीर व पाणी ऊपसा बंद करन्याची मागणी



👉 पिंपळखुटा संगम येथील सरपंचाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

मंगरूळपीर-गावातील पाणी टंचाई बघता गावाजवळील खाजगी विहीर आणी पान्याचा ऊपसा बंद करन्यात यावा या मागणीसाठी पिंपळटा संगम येथील सरपंचा चंदाताई सूदर्शन धोटे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे केला आहे.
           सध्या पिंपळखुटा संगम येथे पान्याची भिषण टंचाई जानवत आहे.
ऊन्हाळा लागायला अजुन खुप वेळ आहे पण हिवाळ्यातच पाणीटंचाईचे ऊग्र रुप जाणवत असल्याने महिलांचे पाण्यासाठी मोठे हाल होत असुन पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे.गावकर्‍यांना व गुराढोरांना होणारा होणारा ञास वाचावा व पिन्यासाठी पाणी ऊपलब्ध व्हावे या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे पण विहिर,हातपंप कोरडे पडत असल्याने मूबलक पाणी मिळने कठीण झाले त्यामुळे गावाजवळील खाजगी विहीरी व ईतर मार्गाने होणारा पाणी ऊपसा त्वरीत बंद व्हावा जणेकरून पिण्यासाठी गावकर्‍यांना पाणी ऊपलब्ध होईल या मागणीसाठी जिल्हाधिकारी वाशिम यांना पिंपळखुटा येथील महिला सरपंचा चंदाताई धोटे यांनी लेखी निवेदन सादर केले आहे.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा