बॅक खातेदाराची प्रचंड गैरसोय
मंगरुळपीर- येथील विवीध बॅकेचे ए टी एममध्ये गेली अनेक दिवसापासुन रोकड नसल्यामुले खातेदाराना व्यवहार करण्याकरीता वेळेवर रोकड उपलब्ध होत नसल्याने अनेक संकटाला सामोरे जावे लागत आहे
सर्व सामान्य जनतेला व्यवहार करणे सुलभ व्हावे याकरिता ए टी एमची सुविधा गतकाळात उपलब्ध करुन दिली मात्र अनेकदा या एटी एम मध्ये रक्कमच राहत नसल्यामुळे नागरीकांना व्यवहार करण्याकरीता मोठी अडचण निर्माण झाली आहे त्यामुळे अनेकांच्या व्यवहारामध्ये मोठा खोळंबा निर्माण झाला आहे ही बाब लक्षात बॅक प्रशासनाने एटीएम मध्ये रक्कम ठेवावी जेणेकरुन सर्वसामान्य जनतेला विवीध करणे सहज शक्य होईल.बॅक ग्राहकांना व्यवहार करणे सोईचे व्हावे तथा कर्मचार्यावरचा काऊंटरवरील कामाचा ताण कमी व्हावा त्यामुळे एटिएम ही प्रभावी सुविधा बॅक ग्राहकांसाठी करन्यात आली पण मंगरुळपीर शहरातील विविध बॅकेचे एटिएम मशीन फक्त शोभेची वस्तुच बनत असुन सदासर्वकाळ तांञीक बिघाडाचे बोर्ड मशीनवर लटकवलेले ग्राहकांना पाहावयास मिळत असुन एटिएममध्ये ठणठणात असल्याचे चिञ आहे. ही सुविधा मंगरुळपीर शहरात तरी सध्या गैरसोईची बनल्याने बॅक ग्राहकांमधे तिव्र नाराजीचा सुर ऊमटत आहे.विविध बॅकेमध्ये ग्राहकांना चांगली वागणूक न मिळता नेहमी गैरसोईंनाच सामोरे जावे लागत असल्याने सबंधितांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा