रविवार, ७ जानेवारी, २०१८

कामरगाव येथे हर्रास झालेले तीन गाळे घेण्यास हर्रासदाराचा नकार


कारंजा तालुक्यात असलेले कामरगाव ह्या गावी ग्रामपंचायतीने दि. २९/१२/२०१७ रोजी तीन गाळे हर्रास केले होते. ज्याची अनामत रक्कम एक लाख रुपये होते .  महिनेवारी भाडे  पंधरा हजार ठेवण्यात आले होते. याचा तपशील असा कि,   बोली लावण्याकरिता दहा हजार रुपये  भरणे आवश्यक असा नियम होता व हर्रासी झाल्यानंतर बोली एक लाख अनामत रक्कम व अनामत रकमेच्या २५ टक्के रक्कम भरणे याची अट होती. व बाकीची रक्कम सात दिवसाच्या आत भरणे अनिवार्य केले होते. अन्यथा भरलेली २५ टक्के रक्कम जप्त करण्यात येईल. त्यामध्ये हर्रासी मध्ये शामिल होण्याकरिता गावातील व्यक्तीच असला पाहिजे अशी देखील ग्रामपंचायतने अट  घातली होती. परंतु आज रोजी ज्यांनी हर्रास झालेले गाळे घेतले होते त्यांनी आता पाठ फिरवली आहे त्यांना विचारणा केली असता भाडे परवडत नाही असे उत्तर आले. २००५ पासून हे गाळे बंद स्थितीत होते. एकंदरीत १२ वर्षानंतर त्यांची हर्रासी झाली परंतु त्याला सुद्धा यश आले नाही. या हर्रासीला हजर असणारे गरजू लोकांनी भाडे वाढीमुळे बोली लावू शकले नाही. म्हणून या गोष्टीमुळे व्यवसाय करणारे लोक वंचित राहिले व काही राजकारनी लोकांनी  बोली वाढवून तीन गाळ्याची हर्रासी स्वतःची करून घेतली व आता भाडे जास्त होत आहे असे सांगून पाठ फिरवली आहे. ग्रामपंचायतीने नियम व अटी लागू केल्यानंतर सुद्धा हा प्रकार लक्षात आला. तसेच  ग्रामपंचायतीने चुकीच्या नियम व अटी ठेवल्या होत्या ज्याचा कोणत्याच गोरगरिबाला फायदा झालेला नाही. 
विनोद नंदागवळी मो. ९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा