रविवार, ७ जानेवारी, २०१८

ना.ना.मुंदडा विद्यालयात स्व.सेठ नारायणदासजी मुंदडा पुण्यतिथी साजरी


मालेगांव:दि.6 जानेवारी रोज शनिवारला ना.ना.मुंदडा विद्यालय,मालेगांव येथे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्व.सेठ नारायणदासजी मुंदडा यांच्या पुण्यतिथी निमित्य भव्य रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 ना.ना.मुंदडा विद्यालय मालेगांव येथे संस्थापक स्वर्गवासी सेठ नारायणदासजी मुंदडा यांच्या 38 व्या पुण्यतिथी निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्यामसुन्दरजी मुंदडा यांची तर प्रमुख वक़्ते म्हणुन कारंजा येथील डॉ.सुशिल देसपांडे,प्रमुख पाव्हने म्हणून मालेगांव तहसीलचे तहसीलदार राजेश वजीरे होते.प्रमुख उपस्तिती म्हणून सचिव सीतारामजी लटोरिया,गोविंद पुरोहित,रामचंद्र मुंदडा,जगदीशजी बळी,डॉ.स्नेहा देसपांडे,शिवसेना शहर प्रमुख संतोष जोशी,डॉ.विजय सोनोने,दन्तरोग तज्ञ अतुल सांबपुरे ,डॉ.वसुधा सांबपुरे,प्रभारी प्राचार्य वसंतराव अवचार,उपप्राचार्य सतीश नवगजे,डॉ.रमेश देशपांडे यांची उपस्तिती होती.कार्यक्रमाच्या सुरवातिला स्व.नारायणदास मुंदडा व विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.सुशिल देशपांडे यांनी आपल्या भाषनामधुन स्व.नारायणदासजी मुंदडा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.ते म्हणाले की,माणसाचे आयुष्य एक खेळ असुन कोणत्याही खेळात जिकणे व हरने या दोनच गोष्टी असतात त्यामुळे त्या खेळात स्वत:ला पूर्णपण झोकून दिल्यास मनुष्य वेगळ्या उंचीवर पोहचते.अशा असामान्य उंचीवर स्व.नारायणदासजी पोहचल्याने ते कार्याच्या रूपाने आमच्यामध्ये आजही जीवंत असल्याचे जाणवते आणि विद्यार्थ्याना शिकन्याची प्रेरणा दिली.
तसेच पुण्यतिथी निमित्य आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यानि रक्तदान केले.यावेळी विद्यालयाच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी चित्रकला प्रदर्शनी,विज्ञान प्रदर्शनी व रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती.विद्यार्थिनी अतिशय सुंदर रांगोळी काढत *बेटी पढ़ाओ बेटी बचाओ* संदेश दिला तसेच नागरतास या गावत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये स्व.नारायणदासजी मुंदडा यांच्या पुण्यतिथी निमित्य शालेय शाहित्य सचिन देवळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय कीर्तनकार श्री.श्रीराम रोडे यांनी केले,सूत्रसंचालन सुरेश मुंदडा तर आभार प्रदर्शन प्रभारी मुख्याध्यापक श्री.अवचार सरानी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या कर्मचारयानी अथक परिश्रम घेतले.
सम्राट टाईम न्यूज़
सिद्धार्थ भालेराव
9552978172

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा