शनिवार, ६ जानेवारी, २०१८

व्यापारी ,ग्राहक यांनी बुधवारी बाजारात यावे- पट्टेबहादुर


* बाजार भरेल सुरळीत *
वाशिम - येथून जवळच असलेल्या ग्राम केकतउमरा येथे पूर्वी बाजार भरत होता. परंतु नंतरच्या काळात मात्र बाजार भरने बंद झाले होता.परंतु हा बंद पडलेला बाजार पुन्हा सुरु व्हावा यासाठी सर्व गांवकरी यांनी पुढाकार घेवून  दिनांक 26 डिसेंबर 2017 रोजी बाजार भरवला. या बाजाराला मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत  गावकऱ्यांना सहकार्य केले.परंतु पुन्हा दुसऱ्या बुधवारी बाजार भरवायचा तर भीमा कोरेंगाव याठिकाणी भिमअनुयायी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अड़.बाळासाहेब आंबेडकर यांनी  संपुर्ण महाराष्ट्र बंद ची हाक 3 जानेवारी 2018 रोजी दिली होती .याच दिवशी ग्राम केकतउमरा येथे बुधवार बाजार होता.परंतु महाराष्ट्र बंद असल्यामुळे येथील गावकरी यांनी भीमा कोरेगांव निषेध म्हणून बाजार भरवला नाही .मात्र आता येणाऱ्या बुधवारी ठरल्याप्रमाणे सर्व व्यापारी यांनी आपला माल बाजारात घेवून यावा. व किरकोळ विक्रेते ,भाजीपाला विक्रेते,हॉटेलवाले,कपडे दुकानदार, किराणा दुकानदार आदि व्यापारी यांनी बाजारात यावे. असे आवाहन येथील नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष प्रविण पट्टेबहादुर यांनी प्रसिद्धिपत्रकातून केले आहे.
      पट्टेबहादुर पुढे म्हणाले की, व्यापारी,व ग्राहक यांनी कसलीही भीती मनात न बाळगता आपण या बाजारात यावे व गावकर्यांना सहकार्य करावे असे देखील प्रविण पट्टेबहादुर यांनी सांगितले आहे.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा