शनिवार, ६ जानेवारी, २०१८

स्व.सेठ नारायणदास मुंदडा पुण्यतिथी निमित्य शालेय शैक्षणिक सहित्याचे वितरण


दि.06 जानेवारी रोज शनिवारला ना.ना.मुंदडा विद्यालय मालेगांव संस्थापक स्व.सेठ नारायणदासजी मुंदड़ा यांच्या 38 व्या पुण्यतिथी निमित्य नागरतास येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरतास या ठिकाणी सकाळी 8 वाजता या शाळेतील विद्यार्थ्यांना  शालेय शैक्षणिक सहित्याचे वितरण ना.ना.मुंदडा विद्यालयाचे विनाअनुदानित शिक्षक सचिन देवळे यांच्या हस्ते करण्यात आले करण्यात आले.
ना.ना.मुंदडा विद्यालय मालेगांव या शाळेवर विनावेतन 5 वर्षापासून विद्यादान करणारे शिक्षक तसेच स्वताच्या खर्चातुंन नागरतास येथील शाळेतील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.आणि याच दिवसी मुंदडा विद्यालयमध्ये विद्यार्थ्याच्या गुणाणा वाव मिळावा या दुस्ट्रिकोनातून वर्षभर वेगवेगळे शालेय उपक्रमाचे आयोजन करतात.नारायणदासजी मुंदडा यांच्या पुण्यतिथी निमित्य चित्रकला स्पर्धा आयोजित केलि होती.या चित्रकला स्पर्धेतून विद्यार्थ्यानी बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेस दिला.
या कार्यक्रमाच्या वेळी ना.ना. मुंदडा विद्यालय मालेगाव  प्रभारी मुख्याध्यापक श्री.वसंतराव अवचार,उपमुख्यध्यापक श्री.सतीष नवगजे,तसेच जि.प.प्रा.शाळा नागरतास मुख्याध्यापक जुमडे सर,शिक्षक झळके सर,कु.टाले मैडम याची प्रमुख उपस्तिती लाभली.
सम्राट टाईम्स न्यूज़
प्रतिनिधी सिद्धार्थ भालेराव
9552978172

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा