मंगरुळपीर-श्री संताजी महाराज यांचा पुण्यतिथी
सोहळा वाशिम येथे स्वामी समर्थ नगरातील वाडेकर यांच्या
शेतातील समाजमंदीरात आज दि.७जानेवारी
२०१८रोजी सकाळी ११वाजेपासुन
आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी
प्रा.हरिभाउ क्षीरसागर यांची तर आ.राजेंद्र
पाटणी,केशवराव गुल्हाने अमरावती,
नरहरि शिंदे हिंगोली,श्याम पाटील दिग्रस,
मधुकर गायकवाड मेहकर,दिलिप
क्षीरसागर अकोला,सौ.ताराताई महिंद्रे
मानोरा यांचे सह परिसरातील मान्यवर
उपस्थित राहणार आहेत.या प्रसंगी समाजातील विचारवंतांचे मार्गदर्शन
लाभणार आहे.समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,सेवानिवृत्त समाज बांधव
समाजातील विद्यार्थी विद्यार्थीनींचा
सत्कार करण्यात येणार आहे.
तरि या कार्यक्रमाला समस्त तेली समाज
बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा वाशीम
जिल्हाध्यक्ष शिवदास सुर्यपाटील व
सामाजिक कार्यकर्ते भगाजी घुले यांनी
केले आहे असे प्रसिध्दी प्रमुख डाॅ.सुधाकर
क्षिरसागर यांनी महाराष्ट्र प्रांतीक तैलीक
महासभा वाशिम जिल्हा प्रसिध्दी प्रमुख
यांनी कळविले आहे.
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा