काही दिवसापासून शेलुबाजार परिसरात जास्त प्रमाणात भारनियम घेण्यात येत आहे. सकाळी ४ ते १०:३० पर्यत भारनियम घेण्यात येत आहे.२१ फेब्रुवारी २०१८ पासून १२ वीच्या परिक्षेला सुरूवात होत आहे व मार्च पासून १० वीच्या परिक्षला सुरूवात होत आहे.बोर्डाचे पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी उठून अभ्यास करावा लागतो.परंतु सकाळी ४ वाजतात विज जात असल्यामूळे सकाळच्या वेळेला विद्यार्थी अभ्यास करू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये अडथळे येत असल्यामूळे विद्यार्थी सकाळी अभ्यास करू शकत नाही. भारनियमा मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षनिक नुकसान होऊ शकते यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.तरी आपण विद्यार्थ्यांची समस्या समजून घेऊन भारनियमाची वेळ सकाळी न ठेवता बदलण्यात यावी तसेच शेळूबजार हे तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असुन येथे आजुबाजुच्या ४० ते ५० खेड्यातील नागरिक ये जा करत असतात तसेच या परिसरात छोटे मोठे उद्योग कारखाने आहेत. त्यांना विजेची नितांत गरज असते. यामुळे आपण भारनियमाच्या वेळेत बदल करून भारनियम कमी करण्यात यावे . याकरिता शेलुबाजार येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन भिमराव सुर्वे , व रूपेश सुर्वे,धनशाम सुर्वे,कृष्णा राऊत,गोपाल सुर्वे,मंगेश सुर्वे,सुरज ठाकरे,हरी वाढणकर,गोपाल सुर्वे..आदी मंडळीनी महावितरण चे उपविभागीय अधिकारी राठोड यांना निवेदन दिलेत.
प्रतिक्रिया
राठोड उपअभियंता महावितरण मंगरुळपीर वरीष्ठाशी चर्चा करून दोन चार दिवसात भारनियमन ची वेळ बदलुन देतो व भारनियम कमीत कमी करण्याचा प्रयत्न करतो.
सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा