कारंजा तालुक्यातील बेंबळा या गावामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येत असलेल्या शौचालय बांधकामासाठी मिळणारे अनुदान हे शौचालयाचे बांधकाम पूर्ण होऊन सात महिने झाले तरीसुद्धा अनुदान मिळाले नाही अशी तक्रार देवेंद्र भाऊराव चक्रे यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती कारंजा लाड येथे केली आहे. सदर व्यक्ती हा अत्यंत गरीब परिवारातील कर्ता पुरुष असून सरकारच्या या योजनेकरिता शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कर्ज घेऊन शौचालयाचे बांधकाम केले परंतु या योजने मार्फत दिले जाणारे १२००० रुपये अद्याप त्यांना मिळाले नाही. देवेंद्र भाऊराव चक्रे यांनी अर्ज स्वरूपात सर्व कागद पात्राची पूर्तता केलेली असून सुद्धा त्यांच्या अर्जाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याचे नेमके कारण काय याचा थांग पत्ता अजून लागलेला नाही. सरकारच्या नवीन नियमानुसार ज्याच्या घरी शौचालय नाही त्यांना कोणत्याच प्रकारचा दाखला देऊ नये असे पारित केले आहे. तरी या प्रकरणी योग्य ती चौकशी करून सदर व्यक्तीस न्याय व लाभ देण्यात यावा अशी मागणी सदर लाभार्थी करीत आहे.
विनोद नंदागवळी कामरगाव मो.९६७३९५४५१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा