👉चोर सोडून संन्याशाला फाशी
👉प्रशासन अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहे संघटनेचा आरोप
वाशिम-
मालेगाव तालुक्यातील मेडशी विद्युत केंद्रातील तंत्रज्ञ सुनील जाधव यांना निलंबित करून प्रशासन अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप करून तांत्रिक कामगार संघटनेने वितरणाच्या जिल्हा कार्यालया समोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.उपोषणाचा आजचा चवथा दिवस असताना प्रशासनाने दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही केली नसल्याने तांत्रिक कामगार संघटनेत संतापाची लाट पसरली आहे.
मेडशी विद्युत केंद्रा अंतर्गत येणाऱ्या रिधोरा गावातील गावठाण आणि कृषी विद्युत तारेवर काही लोक आकोडे टाकून चोरी करत असल्याची माहिती तंत्रज्ञ सुनील जाधव यांना मिळताच त्यांनी काही लोकांना वीजचोरी करण्यापासून अटकाव करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊनही अधिकारी त्यांच्या पाठीशी उभे राहले नाही .जाधव विद्युत चोरीला आला घालण्यासाठी दोन स्पॅन चा कंडक्टर यांनी काढून मेडशी कार्यालयात जमा केला असता तो पूर्ववत कोणी बसविला याची चौकशी होणे गरजेचे आहे खुद्द एक अधिकारिच विद्युत चोरीत भागीदारी असल्याचा आरोप होत आहे विद्युत चोरी प्रकरणात राजकारणी पावर समोर वितरण अधिकाऱ्यांची बत्ती गुल झाली राजकारणाच्या दबावापुढे झुकत वितरण अधिकाऱ्यांने जाधव यांना निलंबित केले चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार घडला.
अहो पांडे साहेब तुम्ही सुद्धा.....
काही महिण्याआधी वितरणाच्या उपविभागीय अभियंता पांडे यांना एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून चांगलेच बदाडले तेव्हा सर्वच कर्मचार्यासह संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या .एका तंत्रज्ञावर हल्ला झाल्यावर मात्र पांडे साहेब राजकारणी शक्ती पुढे मूंग गिळून बसले.पांडे साहेब जनावराला मारल्यास जनावरे सुद्धा एकत्रित लढतात तुम्ही तर माणूस आहात हो..... हल्ला प्रकरणी तुम्ही जातीचे राजकारण तर केले नाही ना ?अशी चर्चा सुरू आहे .
निलंबित कामगारांच्या पाठीशी तांत्रिक कामगार संघटना उभी राहली.संघटनेच्या वतीने जिल्हा कार्यालयावर साखळी उपोषण सुरू आहे उपोषना चा चवथा दिवस असूनही एका ही अधिकाऱ्यांने उपोषण मंडपाला भेट दिली नाही निलंबन अयोग्य झाल्याचे कबुल करत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने विद्युत चोरट्यात दहशत निर्माण करण्यासाठी जाधव यांचे निलंबन केल्याचे बेताल कबुली दिल्याचे एका कर्मचाऱ्यांने सांगितले अहो अधिकारी महोदय तुमच्यात धमक असेल तर विद्युत चोरीत भागीदारी असलेल्या तुमच्या अधिकाऱ्याला निलंबित करून दाखवाच असे कामगार बोलत आहेत निलंबित कर्मचाऱ्याला नाहक बळीचा बकरा बनविण्यात आल्याने वितरण अधिकाऱ्याच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडले आहे निलंबना विरोधात कामगार संघटनेने साखळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे निलंबन रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत शस्त्र म्यान होणार नसल्याची सिंह डरकाळी कामगार संघटनेनं फोडली आहे प्रशासन आता काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा