अविश्वास ठरावाला स्थगिती
फुलचंद भगत
मंगरुळपीर-येथील सभापतीविरूध्द पारित झालेल्या अविश्वास ठरावाला नागपुर खंडपिठाने स्थगीती दिली आहे.दरम्यान न्या.भुषषण आणी न्या.स्वप्ना जोशी यांनी सभापती पद कायम केले आहे.हायकोर्टाच्या या निकालामुळे मंगरूळपीर पं.स.सभापतीला मोठा दिलासा मिळालेला आहे.
१ जानेवारी २०१८ रोजी मंगरुळपीर पं.स.सदस्य वाशिम जिल्हाधिकारी यांचेकडे सभापतीविरुध्द अविश्वास ठराव आनन्यासाठी अर्ज दिला.या अर्जाच्या अनूषंगानेजिल्हाधिकार्यांनी ७ जानेवारी रोजी मंगरुळपीर ऊपविभागिय अधिकार्यांनी पिठासिन अधिकार्यांची नेमणूक केली.तसेच मंगरुळपीर ऊपविभागिय अधिकार्यांनी ९ जानेवारी २०१८ रोजी सर्व सदस्यांनाअविश्वास ठराव पारित करन्यासाठी सभा ही दि.१५ जानेवारी २०१८ रोजी ठेवन्यात आली अशा आशयाची नोटिस काढली.त्यानूसार १५ जानेवारीला सभेत बहूमताने अविश्वास ठराव सभापतीविरूध्द पारित झाला.पं.स.सभापती निलिमा देशमूख यांनी हायकोर्टात रिट याचिका दाखल केली.याप्रकरणी हायकोर्टाने सभापती देशमूख यांचेविरुध्द पारित अविश्वास ठरावाला स्थगीती दिली त्यामुळे सभापती देशमूख हे पदावर कायम असुन सभापतीपदी कार्य करु शकतात.अविश्वास ठराव पारित करतांना कायद्याच्या तरतुदींचे ऊल्लंघन झाले आणी त्यामूळे अविश्वास ठराव हा बेकायदेशिर आहे असे हायकोर्टाला अॅड.अमित व्हि.बंड यांनी सांगीतले.ही बाजु एकुन हायकोर्टाने या अविश्वास ठरावाला स्थगीती दिली आहे.सभापती तर्फे अॅड.अमित व्हि.बंड तर सरकारतर्फे सरकारी वकील अमित चुटके यांनी बाजु मांडली.
फुलचंद भगत
उपसंपादक,सम्राट टाईम्स लाईव्ह
मो.9763007835
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा