रविवार, १४ जानेवारी, २०१८

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने २४ वा नामविस्तार दिन साजरा.


 वाशिम :-
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार दिनानिमित्य स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेच्या वतीने  अभिवादन करण्यात आले,तर नामविस्ताराच्या लढ्यात जे २३ भीम सैनिक शहीद झाले त्यांनाही यावेळी आदरांजली वाहण्यात आली. १४ जानेवारी ११९४ साली झालेल्या या नामविस्तार दिनाला आज २४ वर्ष पूर्ण झाले,त्यानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचा २४ वा नामविस्तार दिन म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पदवीधर संघटनेच्या वतीने  जेष्ठ विधितज्ञ ए. आर.देशपांडे,बार असोशियनचे अध्यक्ष अजय कुमार बेरिया,डॉ.अँड.मोहन गवई,यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,यावेळी प्रा.राजेश ढाकरके,अजय ढवळे पत्रकार ,पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान,डॉ .मंजुश्री जाभरूनकर,विशाल,खंडारे, राजेश इंगोले,प्रमोद सावळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार पडघान यांनी तर उपस्थितांचे आभार अजय ढवळे यांनी मानले.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा