रविवार, १४ जानेवारी, २०१८

मंगरुळपीरमध्ये दिशा मोबाईलशाॅपीवर चोरांचा डल्ला



मंगरुळपीर-दि.१३ च्या राञी ३ नंतर मंगरुळपीर येथील शाॅपिंग सेंटरमधे असलेल्या दिशा मोबाईल शाॅपी चोरट्यांनी शटर वाकवुन कींमती मोबाईल सह सव्वा दोन लाख रुपयांच्या वस्तुवर डल्ला मारला.सदर चोर सिसिटीव्हीमध्ये कैद झाले असुन घटनेची माहीती मिळताच ऊपविभागीय पोलिस अधिकारी यांचेसह ठाणेदार यांनी घटनास्थळी दाखल होवून वाशिम येथील मोबाईल ईन्वेस्टीगेशन टिमने  घटनास्थळाची पाहणी करुण तपास सूरु केला आहे.
              राञी ऊशीरा तिन वाजता नंतर मंगरुळपीर येथील शाॅपिंग सेंटरमधील दिशा मोबाईल शाॅपीचे शटर वाकवून २० किंमती मोबाईल फोन अंदाजे किंमत १लाख ८० हजार,३५ हजार रोख,१० हजार रुपयाची अॅसेसरीज,एटिएम कार्ड आणी बिलबुक घेवून चोर पसार झाले आहेत.
चोरि करणारे चोर सिसिटिव्हिमध्ये कैद झाले असून पोलिसांनी घटनास्थळी येवून व केला तर मोबाईल फोरेन्सिक इन्विस्टीगेशन टिमने पंचणामा करुन तपास सूरु केला आहे.मंगरुळपीर तालुक्यात चोरिंचे सञ वाढतच असुन चोरांना शोधन्याचे पोलिसांपुढे आव्हान ऊभे राहले आहे.


फुलचंद भगत
उपसंपादक,सम्राट टाईम्स लाईव्ह
मो.9763007835

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा