आज 14 जानेवारी रोजी ग्राम ब्राम्हनवाडा ता. मालेगांव येथे मा. गोपीनाथ मुंढे साहेब स्वामी विवेकानंद तसेच राष्ट्रमाता जिजाउ यांच्या त्रिवेनी जयंती निमित्त मँरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेमधे वाशिम जिल्हातील गावागावातुन स्पर्धकांनी सहभाग नोंदविला यामध्ये एकुन दिडसे स्पर्धका पैकी प्रथम क्रमांक किन्हीराजा येथील आकाश देवकर याने पटकावण्यात यश मिळविले
तर दुसरा क्रमांक रिसोड येथील हनुमान कोरडे तर तिसरा क्रमांक दिनेश वाहले याने यश मिळविले मँरेथॉन
स्पर्धेचे अंतर ६ किलोमिटर ठेवण्यात आले होते. या स्पर्धेला गावातील बहुसंख्येने गावकरी उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजु सांगळे भाजपा युवा मोर्चा तालुका सरचीटनिस हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक जेष्ट नागरिक मोतीरामजी लठाड प्रमुख पाहुणे राजेश राठी सा. कार्येकर्ते पंजाबराव घुगे सरपंच मधु खराटे सा. कार्येकर्ते नारायन घुगे उत्तम कांबळे गजानन घुगे हे होते.प्रथम बक्षीस 2100/- पंडीत खुळे ग्रा प सदस्य यांच्या तर्फे दुसरे 1100/- त्र्यंबक तारे यांच्या तर्फे तिसरे 700/- अनिल तायडे यांचे तर्फे व विशेष पहिले बक्षीस घेनारे आकाश देवकर याला प्रोत्साहनपर बक्षिस ब्राम्हणवाडा सरपंच पंजाबराव घुगे यांच्याकडुन ५००/- रु चे बक्षीस देन्यात आले . कार्यक्रमासाठी पंडीत खुळे गजानन तारे आकाश भंडारे शंकर तारे व नवयुवक मंडळ ब्राम्हनवाडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा