मंगरुळपीर-नगर परिषदेअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण १०१८ साठी मंगरुळपीर येथील जिवलग मिञत्व म्हणून ख्याती असलेले रामकुवार रघुवंशी तर शमशोद्दीन जहागीरदार यांची स्वच्छतादुत म्हणून नियुक्ती करन्यात आली आहे.त्यांचे या नियुक्तीबद्दल सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे
शहरात स्वच्छ भारत मिशनने पुन्हा एकदा जोर पकडला असुन शहर स्वच्छ व सुंदर बनविन्यासाठी प्रशासनासोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या मान्यवरांचे सहकार्य घेन्याचे नगरपालीकेने ठरविल्यामुळे येथील शमशोद्दीन ऐनोद्दीन जहागिरदार,रामकुमार लालसिंह रघुवंशी यांची मंगरुळपीर शहराचे स्वच्छतादुत म्हणून मुख्याधिकारी यांनी पञाव्दारे नियुक्ती केली आहे.हे दोघेजन सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर राहत असुन यांच्या दोस्तीचे अनेक किस्सेही शहरवासी आनंदाने सांगतात.दोन भिन्न जातीचे असुनही सर्व समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा या उद्देशाने सणऊत्सवामध्ये हिररीने भाग घेत असुन शहरात शांतता व सुव्यवस्था नांदावी याकरीता सक्रीय सहभागी असतात म्हणून लोक त्यांना शहरवासी "जिगरी दोस्ताची" जोडी हे बिरूद लावतात.याच सामाजीक कार्याची प्रशासनाने दखल घेवून नियुक्ती केल्याने लोकांना समजावुन आणी स्वच्छालय वापरासाठी प्रेरीत करुन शहर स्वच्छ आणी सुंदर नक्कीच बनेल यात शंका नाही.
सम्राट टाईम्स लाईव्ह
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा