दि. 30/12/2017 रोजी बाबा चांदशाहवली संस्थान पिंप्री सरहद्द येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संदल ची भव्य अशि मिरवणूक काढण्यात आली. त्या मिरवणूकीचे अध्यक्ष स्थान म्हणून हारून शाह अब्दुलशाह हे होते. व दुसऱ्या दिवशी सर्व गावकरी मंडळीला महाप्रसादाचे आयोजन कौसरशाह हनिफशाह यानी केले. व प्रसाद वाटपानंतर या संदल निमित्त सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोजशाह अनवरशाह यानी केले. प्रथम नवनिर्वाचित सरपंच तथा उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्य याचे सत्कार करण्यात आले. या संदल व महाप्रसाद कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून माॅ जिजाऊ बहुउद्देशीय संस्था केनवड चे संस्थापक अध्यक्ष प्रशांत गोळे सर हे लाभेले होते. व गावचे पोलीस पाटील पंजाबराव देशमुख, माजी सरपंच किरणताई गाभणे, मोतीलाल सारडा, भाऊराव देशमुख, विठ्ठलराव गाभणे, प्रल्हाद भांदुर्गे, नितीन नाईकवाडे, रौफभाई, अहमदशाह, मन्नान बागवान, हबीब पठाण, सचिन हजारे, प्रभाकर नाईकवाडे,शेख साजीद,असिफ पठाण,नाजीमशाह,अफजल पठाण, आदीची उपस्थिती होती.
सतीश गाभण
मो.9511420333
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा