सोमवार, १ जानेवारी, २०१८

लाच स्वीकारताना वितरणाचा अभियंता acb च्या जाळ्यात



 घरगुती वीज मीटर तपासणीच्या नावखाली कार्यवाहीची धमकी देऊन लाच स्विकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंत्यासह खासगी लाईनमन राजेश देवराव  इढोळे  या दोघाला acb ने रंगेहात पकडले  वाशिम येथील तक्रारदाराच्या घरगुती वीज मीटरची सहाय्यक अभियंता रवींद्र व्यवहारे यांनी तपासणी केली कार्यवाहिची धमकी देत 30 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती  दि 30 डिसेंबर ला  खासगी लाईनमन राजेश इढोळे याने तक्रारदाराच्या घरी 17 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारली  
उर्वरित रक्कम 1 जानेवारीला देण्याचे ठरविले acb ने सापळा रचून राजेच इढोळे याला 12 हजार 500 रुपये लाच स्वीकारताना दि 1 जानेवारीला रंगेतात पकडले लाच प्रकरणी सहाय्यक अभियंता रवींद्र व्यवहारे यांनाही अटक करण्यात आली दोघांविरुद्ध वाशिम पोलीस स्टेशन ला गुन्ह्याची नोंद करण्यात आली सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक सुनिता नासिककर पोलीस उपअधिक्षक व्ही  आर गांगुर्डे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन बी बोराडे यांच्या पथकाने केली आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा