प्रतिनिधी । कारंजा (लाड)
कारंजा नगर पालिकेचे उपाध्यक्ष मुबारक तमीज खान यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा आज दि.१५ जानेवारी रोजी नगराध्यक्ष शेषराव ढोके यांना सुपूर्त केला असून पुढील कार्यवाही करिता सदर राजीनामा जिल्हाधिकारी वाशीम यांना पाठविण्यात आलेला आहे.
कारंजा नगरपरिषदेची पहीली सर्वसाधारण सभा दि.०४ जानेवारी २०१७ रोजी संपन्न झाली होती. या सभेदरम्यान पालिकेच्या उपाध्यक्ष पदी भारिप बहुजन महासंघाचे मुबारक तमीज खान उर्फ एम.टी.खान यांची बहुमताने निवड करण्यात आली होती.पक्षाच्या निर्णयानुसार त्यांना उपाध्यक्ष पद एक वर्षाकारिता बहाल करण्यात आला होता. त्यांंचा उपाध्यक्ष पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नगर परिषद उपाध्यक्ष एम.टी.खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे.
सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा