रविवार, १४ जानेवारी, २०१८

"तब्बल 90 रक्तदानत्यांनी नेहरू युवा केंद्र वाशिम तफ॔ आयोजित रक्तदान शिबीरात केले रक्तदान "


कामरगाव :  येथील  नेहरु युवा केंद्र वाशिम तफ॔ युवा सप्ताचे " अवचित  साधुन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबीरामध्ये तब्बल कामरगांव परिसरातील 90 रक्तदानत्यानी रक्तदान केले या रक्तदान शिबीराच्या उदघाटक मा. सौ. मिनाताई भोने (जि.प.सदस्या ) मा.सौ.ज्यातीताई गणेशपुरे (जि.प.सदस्या) यांनी केले.रक्तदात्यांना फळ वाटप मा. श्री.रवीभाऊ भुते (पं.स) यांनी केले. काय॔क्रमाला अध्यक्ष मा.श्री. गजानन अमदाबादकर हे उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती मा.श्री.रणजीतभाऊ देशमुख(सरपंच) मा.श्री  सय्यद मौसैदीन व मुख्याध्यापिका मा.सौ.सुरेखाताई देशमुख मा.सौ.उमाताई बोरसे मा.सौ  उमाताई थेर(पं स) पत्रकार म्हणुन मा श्री नरेद्र बोरकर मा.श्री मुन्ना उंटवाल मा श्री विनोद नंदागवळी हे उपस्थित होते.
रक्तदान शिबीरामध्ये अकोला येथिल डाॅ. बी.पी.ठाकरे मेमोरियल ब्लड बॅक टीम उपस्थित होते रक्तदान शिबीराचे आयोजक मा.श्री आशिषभाऊ धोंगडे(NYK कारंजा समन्वयक)हे होते. यांनी शिबीरामध्ये T shirt किट रक्तदात्यांना देण्यात आली.या शिबीरामध्ये मोलाचे योगदान नेहरू युवा केंद्र कामरगांव यांनी दिले एकुन रक्तदान शिबीर सुरळीत पार पडले.............

विशाल ठाकरे 8975734338
सम्राट टाइम. कामरगाव प्रतिनिधी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा