सोमवार, २२ जानेवारी, २०१८

मराठा वधु-वर परिचय मेळाव्यातून सामाजिक जिव्हाळा निर्माण होण्यास मदत-मा.आ.विजय जाधव


२२ जानेवारी

वाशिम : बहुसंख्येने असलेला मराठा समाज बांधव सगळीकडे विखुरला गेला. त्यामुळे समाजाचे गरीब श्रीमंत असे दोन भाग होत आहेत. परंतु सामाजिक एकोपा आणि सलोखा कायम राखण्यासाठी वर वधु परिचय मेळावा हे मोठे माध्यम आहे. असे प्रतिपादन माजी आ.विजयराव जाधव यांनी मराठा वरवधु परिचय पालक मेळाव्यामध्ये बोलतांना केले.

स्थानिक वाटाणे लॉन मंगलकार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती नारायणराव गोटे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी पुढे बोलतांना अ‍ॅड. विजयराव जाधव म्हणाले की, मराठा समाजाला योग्य दिशा देण्यासाठी समाज बांधवांनी आपसातील मतभेद विसरून राजकारण विरहित असा प्लॉटफार्म निर्माण करणे ही काळाची गरज आहे. मराठा वरवधु परिचय मेळाव्यामध्ये ज्या तरूण तरूणींनी आपआपले मनोगत व्यक्त केले. त्या मनोगतातून मराठा समाजातील जुन्या चालीरुढी बदलतांनाच समाज हा शिक्षण आणि उद्योगामध्ये पुढे कसा जाईल या दृष्टीने सांगोपांग विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले, मराठा समाजात गरीब श्रीमंत विंâवा छोटा मोठा असा भेदभाव समुळ नष्ट झाला पाहिजे यासाठी समाजधुरीणांनी राजकीय मतभेद बाजुला ठेवून एकोपा साधणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले,  

मराठा समाजातील वरवधु या कार्यक्रमासाठी मोठया संख्येने हजर झाले होते. या वेळी ६८ उपवर वरवधुंनी आपआपले मनोगत व्यक्त करतांना समाजातील हुंडा प्रथेला थांबविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. वधुवर परिचय पुस्तीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. उपस्थित पालकांपैकी, चार पालकांनी वधुवर परिचय मेळाव्यातून समाजाला एकत्रित येण्याची संधी मिळाली असल्याने भविष्यातही समाजाच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचे सांगीतले. 

आ.अमित झनक यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, वाशिम जिल्हयाच्या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी समाजातील उपवर वरवधुंचे  सोयरीक जुळविण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत प्रशंसनिय असून अशा मेळाव्यातूनच सामाजिक जनजागृती  निर्माण होत असल्याने असे मेळावे ही काळाजी गरज आहे. असे ते म्हणाले. यावेळी माजी आ.किसनराव गवळी, बाळासाहेब खरात, पांडूरंग ठाकरे, अ‍ॅड. एस. के. उंडाळ, श्रीमती शांताबाई शिंदे आदिंनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी मराठा समाजातील युवक युवतींना रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सुप्रसिध्द उद्योगजक अविनाश जोगदंड यांनी मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित तरुण- तरुणींनी शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळत नाही. मात्र, नोकरीच्या शोधात असलेल्यांना अशा कार्यक्रमातून उद्योगाविषयी रोजगार मिळविण्यासाठी एक मोठी संधी अविनाश जोगदंड यांनी प्राप्त करून दिल्याचे सांगितले. 

मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीकांत महाकाळ, बाळासाहेब खरात, माधवराव अंभोेरे, महादेवराव काकडे, भाऊसाहेब काळे, अविनाश जोगदंड, मारोतराव लादे, सहदेवराव शिंदे, स्वच्छता दुत सौ.संगीता अव्हाळे, डॉ.अनिल कावरखे, डॉ.दीपक शेळके, विजय काळे, माणिकराव जोगदंड, प्रा.नंदकिशोर मवाळ, नारायणराव बारड,  भगवानराव बोरकर, विठठलराव आरु, दत्ताभाऊ लोणसुने, डॉ.मदन नरवाडे, डॉ.अशोक इंगोले, डॉ.अशोकराव करसडे, रावसाहेब राहणे, राजेश दहातोंडे आदिंची उपस्थिती होती. या प्रसंगी गायकवाड आणि काटे परिवारातील उच्च विद्याविभूषीत मुलामुलींचा विवाह सर्वांच्या साक्षींने साध्या पध्दतीने संपन्न झाला. मेळाव्याचे प्रास्ताविक माधवराव अंभोरे यांनी तर संचालन प्रा.प्रभाकर भालेराव यांनी केले. यावेळी दोन हजारावर समाज बंधुभगिंनींची उपस्थिती होती.  

  सम्राट टाइम्स  मीडिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा