सोमवार, २२ जानेवारी, २०१८

मंगळवारी शहरात भव्य मोफत आयुर्वेदीक रोगनिदान शिबीर


औषधीचे मोफत वितरण : लाभ घेण्याचे आवाहन
वाशीम - अथर्व आयुर्वेद, जय माता दी बहूउद्देशिय संस्था व विदर्भ अर्बन अ‍ॅन्ड रुरल को-ऑप. क्रेडीट सोसायटी  यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हावासीयांसाठी शहरात मंगळवार, 23 जानेवारी रोजी भव्य मोफत आयुर्वेदीक रोगनिदान  व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक पुसद नाका येथील तुर्के संकुलातील अथर्व आयुर्वेद मध्ये सकाळी 11 ते 5 या वेळेत होणार्‍या या शिबीरात रुग्णांची मोफत रोगनिदान तपासणी करुन रुग्णांना गोळ्या व कॅप्सुल मोफत देण्यात येतील. शिबीरामध्ये आम्लपित्त, वातविकार, संधीवात, मुळव्याध, मुतखडा, दमा, अ‍ॅलर्जी, त्वचा विकार, श्वेतप्रदर, मासीक पाळीचे आजार, डोके दुखणे, डोक्याचे विकार, इतर बरेचसे जुनाट आजारावर तपासणी व औषधोपचार केले जातील. तसेच वातविकार, आम्लपित्त, दमा, मुतखडा, मुळव्याध, त्वचाविकार इतर विकारावर डॉ. बी.के. व्यास, वारंवार होणारी सर्दी, बालदमा, धुळीची अ‍ॅलर्जी, नाकाचे हाड वाढणे, मुतखडा, श्वेतप्रदर, स्तनातील गाठी, कॅन्सर, त्वचारोग, मायग्रेन इत्यादी विकारावर जयपुर येथील डॉ. प्रिती चव्हाण रुग्णांची तपासणी करतील. तसेच तेल्हारा येथील प्रसिध्द नाडीपरिक्षक वैद्य गणेश उमाळे हे रुग्णांची नाडी परिक्षण करुन सर्व जुनाट रोगांवर आयुर्वेदीक उपचार करतील. तरी जिल्हयातील गरजु व व्याधीग्रस्त रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन अथर्व आयुर्वेदच्या वतीने करण्यात आले आहे.
सम्राट टाइम्स मीडिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा