सोमवार, २२ जानेवारी, २०१८

बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे


👉 मनुवाद्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी

वाशीम - बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक डॉ. आर. एस. जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी सोमवार, 22 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देवून सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकार्‍यांच्या प्रतिनिधी महसूल तहसीलदार श्रीमती वाणी यांना निवेदन सादर करण्यात आले. 
    यावेळी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, 1 जानेवारी 2018 रोजी भिमा कोरेगाव रणसंग्रामातील शहीदांना सलामी देण्याच्या व्दिशताब्दी वर्षानिमित्त जमलेल्या मुलनिवासी बहुजन समाजातील लोकांवर हल्ला करण्यात आला. दरम्यान बामसेफचे राष्टीय अध्यक्ष वामन मेश्राम आणि बामसेफच्या भारत मुक्ती मोर्चा व इतर शाखांतर्फे भिमा कोरेगाव येथील व्दिशताब्दी कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी 51 हजार कार्यक्रम ठिकठिकाणी घेतले. परिणामत: भिमा कोरेगावात 1 जानेवारी रोजी 5 ते 6 लाखांच्यावर बहुजन समाज एकत्र झाला. ज्यामध्ये बौध्द समाजाचा सर्वांधिक भरणा होता. त्यांच्यावर भिडे, एकबोटे व दवे यांनी चिथावणी देवून सवर्ण समाजातील तरुणांची माथी भडकवली व मोठमोठ्या इमारतीवरून दगडांचा वर्षाव केला. यामध्ये अनेकजण जखमी झाले. तर एकजण ठार झाला. बरेच जण जखमी झाले. त्याच्या निषेधार्थात महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात धरणे आंदोलन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून महामहिम राष्टपती भारत सरकार यांना देण्यासाठी करण्यात आले. भिमा कोरेगाव येथील दंगलीत मिलींद एकबोटे, मनोहर उर्फ संभाजी भिडे व आनंद दवे यांच्यावर अ‍ॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल असून सुध्दा त्यांना पोलीसांव्दारा अटक न करता उलट संरक्षण देणे हे न्यायप्रक्रियेला न जुमानण्याचे धोरण आहे. त्यामुळे त्वरीत अटक करावी. त्याबरोबरच शांततापुर्वक संवैधानिक पध्दतीने निषेधार्थ बंद पाळणार्‍या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे आणि नक्षल्यांच्या नायनाटासाठी राबविण्यात येणार्‍या कोम्बींग ऑपेरशनच्या व्दारे पोलीस व राज्य शासनाच्या मार्फत निरपराध तरुणांवर अटक सत्र चालविणे, बहुजन समाजातील बौध्द व मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी वृत्तपत्रे, प्रसार माध्यमे यांच्या माध्यमातून विवाद उभे करणे, दंगलीतील बळी ठरलेल्या जखमी झालेल्या वाहनांचे नुकसान झालेल्या तक्रारदारांच्या पोलीसांकडे एफआयआर नोंदवून न घेणे सोबतच दंगा करणार्‍यांना पोलीस व राज्य शासनाव्दारा संरक्षण देवून जातीय वैमनस्य निर्माण करणे, तथा दंगलखोरांना संरक्षण देण्याच्या निषेधार्थ राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात राष्टलपतींना निवेदन सादर करण्यात आले.
    यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजक डॉ. आर. एस. जाधव, नफ अध्यक्ष मिलींद सुर्वे, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी अनुक्रमे पे्रमानंद अरखराव व मंगल इंगोले तसेच इतर शेकडो आंदोलनकर्त्यांना आंदोलन मंडपात निषेध व्यक्त करून प्रमुख वक्त्यांनी यासदंर्भात आपले मनोगते व्यक्त केली. या धोरणाला ग्रामस्थ व वाशिमकरांनी रजिष्टरवर स्वाक्षर्‍या करून आपला पाठिंबा दर्शविला.

सम्राट टाइम्स मीडिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा