सोमवार, २२ जानेवारी, २०१८

शेतकरी कर्जमाफी चुकीच्या धोरणा विरोधात युवा शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन



👉 पोलिसांसह अधिकाऱ्यांची तारांबळ

👉अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांनी केली मध्यस्थी

 सम्राट टाइम्स मीडिया

शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी जाहीर करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केल्याच्या निषेधार्थ कोळगाव येथील युवा शेतकऱ्याने आज दुपारी 1 वाजता अचानक  जिल्हापरिषद परिसरातील उंच टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन छेडल्याने अधिकाऱ्यासह पोलिसांची तारांबळ उडाली .अखेर अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले .
मालेगाव तालुक्यातील कोळगाव बुजरूक येथील युवा शेतकरी विजय पंडितराव शेंडगे यांनी 15 जानेवारीला  मालेगाव तहसीलदारा ला निवेदन दिले होते . निवेदनात शासनाने कर्जमाफी जाहीर करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय केल्याचा आरोप केला.  शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दीड लाखा पर्यंत कर्ज माफी दयावी अशी मागणी केली .शेतीमाला हमी भाव नाही शेतकऱ्यानी जगावे तरी  कसे असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदनातून केला  . युवा शेतकरी शेंडगे यांनी मुख्यमंत्र्याना निवेदनातून इच्छा मरणाची परवानगी मागितली अन्यथा कुटुंबातील व्यक्तींनी आत्महत्त्या केल्यास शासन त्याला जबाबदार राहणार असल्याचा इशारा दिला होता त्याअनुषंगाने शेंडगे यांनी आज शोले स्टाईल आंदोलन छेडले सतत 4 तास आंदोलन सुरू असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी , महसूल अधिकारी पोलीस विभागासह अग्नी शामक दल घटनास्थळी पोहचले जिल्हापरिषद परिसरात बघ्यांची एकच गर्दी केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले अखेर 3 तासानंतर अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले 

सम्राट टाइम्स मीडिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा