सोमवार, १५ जानेवारी, २०१८

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारणी जाहीर



वाशिम-विनोद तायडे

महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष  पुरुषोत्तम आवारे पाटील यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांनी  हॉटेल व्यंकटेश येथे आयोजित  पत्रकार संघाच्या बैठकीत  जिल्हा  कार्यकारणी  जाहीर केली बैठकीच्या अध्यक्षस्थानी विनोद तायडे हे होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला  छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांच्या  प्रतिमेचे पूजन  जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या हस्ते  पूजन  करण्यात आले .यावेळी जिल्हा कार्यकारणीची अविरोध निवड करण्यात आली .
जिल्हाध्यक्ष पदी विनोद तायडे ,जिल्हा कार्याध्यक्षपदी महादेव हरणे ,जिल्हा उपाध्यक्ष- फुलचंद भगत, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर नाईकवाडे, जिल्हा संघटक -डॉ माधव हिवाळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप पिंपळकर, वाशिम शहराध्यक्ष  सौरभ गायकवाड,,वाशिम तालुकाध्यक्ष- सुरेश इंगोले, रिसोड तालुकाध्यक्ष सचिन गांजरे, मानोरा तालुकाध्यक्ष सुशील भगत आदींची अविरोध निवड करण्यात आली. 


 नवनिर्वाचित पदाधिकाऱ्या सह तालुका अध्यक्षांचा  हार व संघटनेची दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला.बैठकीला जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुलचंद भगत यांनी तर आभार सौरभ गायकवाड यांनी मानले  
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा