सोमवार, १५ जानेवारी, २०१८

फुलचंद भगत यांची महाराष्ट बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हा ऊपाध्यक्षपदी बिनविरोध निवड



अल्पकाळात पञकारीतेत ठसा ऊमटवणारे युवा पञकार म्हणून ओळख

वाशिम-महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हा ऊपाध्यक्षपदी  मंगरुळपीर येथील सम्राट टाइम्स पोर्टल न्यूज चॅनलचे सह संपादक तथा एन टिव्ही न्युज मराठी चे रिपोर्टर फुलचंद भगत यांची  एकमताने अविरोध निवड करण्यात आली .
महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे महाराष्ट्र  अध्यक्ष पुरुषोत्तम आवारे पाटील यांच्या आदेशाने संघाच्या  जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन दि 15 जानेवारीला स्थानिक हॉटेल व्यंकटेश येथे करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी विनोद तायडे हे होते 
यावेळी जिल्हा कार्यकारीणीसह काही तालुक्यामध्येही पदाधिकार्‍यांची नियुक्ती करन्यात आली.जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या हस्ते  त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येऊन त्यांचा हार व संघटनेची दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला.बैठकीला जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुलचंद भगत यांनी तर आभार सौरभ गायकवाड यांनी मानले.फुलचंद भगत हे सामाजीक कार्याबरोबरच पञकारी क्षेञात अत्यंत कमी वेळात आगळावेगळा जिल्हातच नव्हे तर जिल्ह्याबाहेरही वेगळा ठसा ऊमटवणारे युवा पञकार असुन सदैव जनसामान्यासाठी आपल्या लेखणीव्दारे झटत असतात,याच कार्याची वरिष्ठांनी व महाराष्ट बहूजन पञकार संघाने दखल घेवून त्यांचे गळ्यात वाशिम जिल्हा ऊपाध्यक्षाची माळ बिनविरोध घातल्याने  यांच्या निवडींने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा