मंगरुळपीरचे युवक सामाजीक कार्यात अग्रेसर
मंगरुळपीर -शहरात सतत कार्यरत व सर्वांच्या परिचयातील असलेली संस्था यंग सिटीझन टीम ऑफ मंगरुळपीर जसे दरवर्षी नूतन वर्षाची सुरुवात हि आपल्या नवीन तर्हेने करत असता तसेच दर वर्षी प्रमाणे या नव वर्षाच्या संक्रांतीला सुद्धा "एक क्षण सुखाचा .." हा उपक्रम चित्रऋषी महाराज वृद्धाश्रम व मूक बधिर विद्यालय , वरुड, मं.पीर येते रविवारी मोठ्या जोरठावत पार पडला.
नव वर्षाच्या सणांची सुरुवात हि संक्रांतीपासून होते हे लक्षात घेता यंग सिटीझन्स वर्षाची सुरुवात हि वृद्धश्रम मधील वृद्ध व्यकतींबरोबर तीळ गुळचे वाटप करून त्यांचा आशीर्वाद घेत आपला पहिल्या सणाचा आनंद द्विगुणित करता. वर्ष भर आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या मूक बधिर चिमुकल्यांना वाटणाऱ्या एकोपाच्या भावनेला दूर करायचा हा एक छोटासा प्रयत्न संक्रांतीला दरवर्षी यंग सिटीझन टीम करून केला जातो. वृद्धांना कधी असं वाटू नये कि आपलं कुणी नाही म्हणून हा त्यांचा मनातला विचार दूर करण्याचा प्रयत्न असतो . आनंद हा वाटल्यानेच वाढतो हि भवना मणी ठेवत उपक्रम राबवला जातो . यंदाच्या वेळेला वृद्धांच्या काही समस्या लक्षात घेता असं जाणवलं की वृद्धाश्रम मध्ये फॅन ची गरज आहे तर संक्रांतीच्या शुभ दिवशी वृद्धाश्रम ला यंग सिटीझन टीम ने फॅन देऊ केले त्याच बरोबर लहान मुलांना फळाचे वाटलं देखील करण्यात आले . संस्थेच्या या कार्यामुळे वृद्धाश्रमाची तात्पुरती हा होईना गरज भागली.
आपल्या दैनंदिन जीवनातील आपण गरजूंना एक क्षण देखील आनंद वाटला तर त्या व्यक्तीच्या आनंदाला पारा राहत नाही . दर वेळेस च्या येण्या जाण्या मूळे तेथील वृद्धाश्रम वरील मुलांचे व संस्थेचे एक प्रेमाचे नाते जुळले आहे ज्यामुळे दार वेळेस चिमुकले आतुरतेने या आनंदी क्षणांची वाट पाहता. अशा प्रकारे या शुभ पर्वावर लहान तथा वृद्धांच्या चेहऱ्यावरचे हास्य टिपण्यासाठी यंग सिटीझन टीम चे उप अध्यक्ष अतुल खोपडे, समरजीत रघुवंशी, पुरूषोत्तम शर्मा, आकाश चौधरी, भूषण गिरीधर, भूषण वैद्य, सोमनाथ परंडे, करन मुंढरे, दीपक खांबलकर, अनुप इंगळे, मयुर पाटील, सूचित देशमुख, श्रीकांत महल्ले आदींनी आपले विशेष सहकार्य केले.
फुलचंद भगत
उपसंपादक,सम्राट टाईम्स लाईव्ह
मो.9763007835
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा