वाशिम, दि. १९ : सुशिक्षित बरोजगार अभियंता किंवा गावांतील मशिनधारकांना कंत्राटदार म्हणून ई-निविदा प्रक्रीयेमध्ये भाग घेता यावा, यासाठी वाशिम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत मशिनधारकांची नोंदणी करण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील सुशिक्षित बरोजगार अभियंता किंवा गावांतील मशिनधारकांनी आपली नोंदणी करावी, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा जलयुक्त शिवार अभियान समितीचे सदस्य सचिव दत्तात्रय गावसाने यांनी कळविले आहे.
कंत्राटदार म्हणून नोंदणी करण्यासाठी मशिनधारक हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक असून त्यास केवळ स्वजिल्ह्यातच नोंदणी करता येईल. मात्र त्याला सिमेंट नाला बांध व वळण बंधारा ही कामे वगळून महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यात मृद व जलसंधारणाच्या कामाकरिता कृषि विभागाच्या ई-निविदा प्रक्रियेमध्ये कंत्राटदार म्हणून भाग घेता येईल. याकरिता त्याचे स्वतःच्या मालकीचे मशिन असावी, स्वतःचे ओळखपत्र, पॅनकार्ड, आधारकार्ड, व्यवसाय कर नोंदणी प्रमाणपत्र, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, बँक खाते पुस्तक, मशिनचे आर. सी. बुक, टी. सी. बुक व पोकलॅन मशिन खरेदी पावती, कंत्राटदार कोणत्याही विभागाचे काळया यादीत नसल्याबाबतचे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र तसेच विहित नोंदणी अर्जासह ५ हजार रुपये नोंदणी शुल्क जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे नांव धनाकर्ष (डीडी) अथवा ऑनलाईन जमा करुन चलनाची प्रत नोंदणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. सदर नोंदणी ही तीन वर्षाकरिता वैध राहणार आहे. संबधित नोंदणी अर्ज, अटी व शर्ती तसेच प्रतिज्ञापत्राचे प्रारुप जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामध्ये उपलब्ध असून अर्जाची फी १०० रुपये भरुन अर्ज उपलब्ध करून घेता येईल. तरी वाशिम जिल्ह्यातील इच्छुक बेरोजगार अभियंता, मशिनधारकांनी आपली मशिननोंदणी करुन ई-निविदा प्रक्रियेमध्ये कंत्राटदार म्हणून भाग घेण्याचे आवाहन श्री. गावसाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सम्राट टाइम्स मीडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा