शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्सवात साजरी.


कामरगाव - येथील कला व विज्ञान महाविद्यालयात  12 जानेवारी  2018 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद  यांची जयंती  मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित बौधीक कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ .सिध्दार्थ वाठाेडे . तर प्रमुख उपस्थिती डॉ. अर्चना बजाज यांची होती.
     कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या पूजनाने व दीपप्रज्वलाने झालि. कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना प्रा. शरद उमाटे. यांनी कार्यक्रमाच्या अायोजना मागील उद्देश सांगून तरुणांनी स्वामी विवेकानंदाचे विचार व कार्याची प्रेरणा घेऊन राष्ट्रउभारनित हातभार लावावा असे सांगितले तर डॉ.  बजाज यांनी त्यांच्या कार्याची व्याप्ती किती होती,  हे सांगून तरुणांनी जीवन मूल्यांचा स्वीकार करावा असे सांगितले. अध्यक्षीय भाषांनातून डॉ .सिध्दार्थ वाठाेडे सर यांनी जिजाऊच्या कार्याची महती सांगितली .
या प्रसंगी विध्याथ्यांनी आपले विचार मांडले. त्यात कु. दुर्गा बारखडे. व कु. शीतल बोबडे. यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. राजश्री साळविकर हिने तर आभार दर्शना घोडे हिने मानले.  या कार्यक्रमाला डॉ. गजानन हिवराळे. प्रा. नितेश थोरात. प्रा. प्रकाश भगत  यासह बहुसंख्य विध्याथ्यांची उपस्थिति होती .

विशाल ठाकरे. 8975734338
सम्राट टाइम. कामरगाव प्रतिनिधी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा