शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

त्या पाच बौध्द तरुणावरील खोट्या तक्रारीची चौकशी करन्याची मागणी

मंगरुळपीर-भिमा कोरेगाव येथील भ्याड हल्याच्या निषेधार्थ महाराष्ट बंदमध्ये शेलुबाजार येथे दि.३ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेमध्ये बौध्द समाजातील पाच तरुणावर केलेल्या खोट्या तक्रारीची कसुन चौकशी करुन त्या रद्द करन्यासाठी भारिपचे तालुकाध्यक्ष शंकर तायडे यांनी निवेदनाव्दारे ऊपविभागिय पोलिस अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनाचा आशय असा की,दि.१ जानेवारी रोजी बौध्द समाजावर भ्याड हल्ला करन्यात आला होता त्याचा निषेध म्हणून दि.३ रोजी महाराष्ट बंद सर्व जातीधर्मीयांनी पाळला.या दरम्यान शेलुबाजार येथे एका बौध्द युवकाला काही जातीवादी लोकांकडुन मारहान झाल्याने त्याविरुध्द अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करन्यात आला.त्यामुळे बौध्द समाजावर दबाव आनन्याच्या दृष्टीने एका महिलेला हाताशी धरुन पाच बौध्द तरुणावर खोटी तक्रार दाखल केली.सदर तक्रार बिनबुडाची असुन याविषयी सखोल चौकशी करुन पाच बौध्द तरुणावरील दाखल गुन्हे खारिज करावे या मागणीसाठी भारिपचे तालुकाध्यक्ष शंकर तायडे यांनी पोलिस विभागासह वरिष्ठांनी लेखी निवेदन सादर केले आहे.निवेदनावर समाधान भगत,जगदिश दंदे,समाधान खडसे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा