मंगळवार, २ जानेवारी, २०१८

अन्न व औषध प्रशासना सह पोलिसांचे दुर्लक्ष,गुटख्याची तस्करी मध्य प्रदेशातून





कारंजा शहर बनले गुटख्याचे मुख्य केंद्र ; अकोला,वाशिम,अमरावती,यवतमाळ ला पुरवला जातो गुटखा 

कारंजा

   गुटखाबंदीचा आदेश हा केवळ कागदापुरताच मर्यादित राहिला आहे. शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओडखल्या जाणाऱ्या कारंजा शहरामध्ये सर्रास गुटख्याची विक्री होत असून येथील गुटखा किंग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा गुटखा पुरवत आहे. हे विशेष  याउलट बंदीच्या नावाखाली गुटख्याची किंमत दुपटीने वाढली असून, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गुटख्याची तस्करी सुरू आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासन विभागाने केवळ बंदीचा देखावा निर्माण केला आहे. 

      राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांपासून राज्यात गुटखा बंदी केली आहे. मात्र, कारंजा सह जिल्ह्यात सध्या मोठय़ा प्रमाणात अवैध गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. मात्र अन्न व प्रशासन विभागाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसून फक्त देखावा करत आपला हप्ता वाढवून घेतो, असा आरोप होत आहे.आंध्र आणि मध्य प्रदेशातून गुटख्याची तस्करी होत असताना कारंजा हे तस्करीचे प्रमुख केंद्र मानल्या जात आहे. कारंजा येथीलफिरोज नामक व्यक्ती आपल्या राजकीय बळामुळे दिल्ली वेश जवळून पूर्ण विभागात तस्करी करीत आहे. या मध्ये भेसळयुक्त गुटक्याचा प्रमाण अधिक असल्याची खात्री लायक माहिती आहे.  हा गुटखा दुचाकी आणि कमांडर वाहनातून मोठ्या प्रमाणात येत आहे. तस्करी करणारे वाहन हे कारंजा पर्यंतच येते. तेथून जिल्हाभर गुटख्याचे वितरण होत आहे. त्यामुळे छुप्या मार्गाने गुटख्याची विक्रीही अव्वाच्या सव्वा भावाने होत आहे. यावर आता निर्बंध कोण घालणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गुटखा विक्रेत्यांवरील कारवाई म्हणजे मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर अशी काहीशी स्थिती येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांची झाली आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांसह गुटखा शौकिनांचेही फावत आहे.


कारंज्यात विविध ठिकाणी गुटखा माफियांचे गोडाऊन

शहरातील मेमन कॉलनी, हयात नगर, मदरसा कॉलनी तसेच कान्नव जीन परिसरात गुटखा माफियांचे गोडाऊन आहे. येथूच चार ते पाच जिल्ह्यात गुटखा माफियांना अवैध प्रमाणात गुटखा पुरवल्या जातो. हा सर्व प्रकार अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने होत आहे.


कारंजा शहर पोलिसांनी पकडला गुटखा 

शहरातील महात्मा फुले चौक येथील शाहीद पान मटेरीअल व गोळी भंडार या दुकानात छापा टाकून १,१५,९०० रुपयाचा माल जप्त करण्यात आल्याची घटना दि.०१ जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुकान चालक इर्शाद अली रजा अली (वय ४८)रा.रंगारीपुरा कारंजा यांना अटक करून पुढील कार्यवाई करिता अन्न  व औषध प्रशासन  विभाग अकोला यांच्या कडे सोपविण्यात आले आहे. हि गुटखा विक्रेत्यांवरील कारवाई म्हणजे मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर अशी असल्याची चर्चा आहे. 


ठोस माहिती द्या; कारवाई करू 

कारंजा शहरामध्ये कुठेही अवैध धंदे सुरु असतील तर नागरिकांनी माहिती द्यावी. खबऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. 

-एम एम बोडखे, ठाणेदार कारंजा शहर पोलीस स्टेशन  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा