मानोरा:- तालुकातील दापुरा येथे सोमवार दि.२५ डिसेंबर २०१७ पासून ते सोमवार दि.१ जानेवारी २०१८ पर्यंत येथील जगदंबा देवी संस्थान नाईक नगर याठिकाणी सेवालाल महाराज ग्रंथ वाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताहात सेवालाल महाराज ग्रंथाचे वाचन ह.भ.प.श्री.रामलाल महाराज माणकी (आंबा) यांनी केले.यावेळी सदर ग्रंथ वाचनाला येथील स्व.देवानंद महाराज भजनी मंडळ यांनी साथ संगत दिली.दि.२५ डिसेंबर पासून रोज दिवसभर ग्रंथ वाचन व सायंकाळच्या वेळी भजनाचे कार्यक्रम होते.ज्यामध्ये दापुरा येथील लालसिंग महाराज,श्रीकिशन महाराज,मंगल महाराज,सखाराम महाराज(नाईक),वडगाव येथील गुलाब महाराज, सोयजना येथील पंडित महाराज,गोवर्धन महाराज दापुरा व निरंकारी सत्संगाचा कार्यक्रम व भोयनी येथील किसन महाराज व नामदेव महाराज यांचे जागरांचे कार्यक्रम होते.दिनांक १ जानेवारी ला महाप्रसाद व जागरणाचा कार्यक्रम होता यावेळी इतर गावातील १५ भजनी मंडळांनी भजनाद्वारे गावातील लोकांना प्रबोधन केले.तसेच दि.२ जानेवारीला गावात मिरवणूक व शोभा यात्रा काढण्यात आली.यावेळी महिला व पुरुषांनी पारंपारीक वेशभूषा परिधान करून जल्लोष केला.सदर सप्ताहच्या यशस्वितेकरीता येथील स्व.देवानंद महाराज भजनी मंडळ,सेवालाल मंडळ,दुर्गामाता मंडळ,दुर्गा माता क्रीडा मंडळ,महाराणा प्रताप मंडळ इतराणी व गावातील महिला,पुरुष,युवक यांनी अथक परिश्रम घेतले.
सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा