भिमाकोरेगाव भ्याड हल्ल्याचा निषेध
भिमाकोरेगाव येथे शौर्यदिनी अज्ञात समाजकंठकांनी भीमसैनिकावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मेडशी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवून समाजकंठाकावर कडक कार्यवाही करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष दीपक वानखडेसह शेकडो भीमसैनिकांनी पोलीस जमादारला निवेदन दिले .
भीमा कोरेगाव ला ऐतिहासिक इतिहास आहे .1 जानेवारी 1818 साली 500 महार सैनिकांनी 2500 हजार पेशवे सैनिकांचा खात्मा केला. वीर सैनिकांच्या स्मरणार्थ हा दिवस शौर्यदिन म्हणून पाळल्या जातो .दरवर्षी फुले शाहू आंबेडकर चळवळीतील लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने विजयस्तंभाला मानवंदना दिली जाते . दरवर्षी फुले शाहू आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने मानवंदना देण्यासाठी भिमाकोरेगाव येथे एकत्रित येतात .यावर्षी अज्ञात समाजकंठकांनी भिमाकोरेगाव येथे भीमसैनिकावर तुफान दगडफेक करून शेकडो वाहनांची जाळपोळ केली . दंगल उसळली यात दोघांचा मृत्यू झाला .त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. कलंकित घटनेच्या निषेधार्थ मेडशीत स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळण्यात आला . दुकाने प्रतिष्ठाने,हॉटेल, मटनाची दुकाने ,भाजीपाल्याची दुकाने ,पान टपरी सह सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली.
गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जमादार सुरेंद्र तिखिले, जमादार रमेश जायभाये ,पोलीस कर्मचारी विलास गायकवाड ,टाले यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला .यावेळी
पोलीस बॉईज संघटने चे जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांनी सुद्धा अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष प्रयत्न ठेवले.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा