भीमसैनिकांनी पुकारला बंद
भिमा कोरेगाव येथे जातीयवादयांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या व पांगरी नवघरे येथे जातीयवाद्यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ भीमसैनिकांनी उद्या दि 3 जानेवारीला मालेगाव बंद पुकारण्यात आला आहे .
भीमा कोरेगाव येथे जातीयवादयांनी तुफान दगडफेक केली . दंगल पेटविली त्यात एकाचा मृत्यू झाला. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे 31 डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची विटंबना केली .दोन्ही घटनेच्या निषेधार्थ उद्या भीमसैनिकांच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे .तरी सर्वांनी उस्फुर्तपणे बंद यशस्वी करावा असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे मालेगाव तालुका अध्यक्ष संदीप सावळे यांनी केले आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा