वाशिम - 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव (पुणे) येथे दोन गटात उद्भवलेल्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असतांना वाशिम जिल्ह्यात सुद्धा या घटनेचे पडसाद उमटले. परंतु कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून शांततापूर्वक आपल्या उत्कृष्ट कार्यप्रणालीने सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन जिल्ह्यात यशस्वीपणे जातीय सलोखा व शांतता प्रस्थापित करणार्या कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हा नागरी सत्काराचा कार्यक्रम जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या दालनात 19 जानेवारी 2018 रोजी दुपारी घेण्यात आला. यावेळी मोक्षदा पाटील यांचा पदाधिकार्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी म्हणाले की, जिल्हयातील नागरिक हे शांतताप्रिय व कायदा सुव्यस्था पाळणारे आहेत. त्यामध्ये मोक्षदा पाटील यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी जर जनतेत मिळून काम करत असतील तर त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेणे हे सामाजीक संघटनांचे कर्तव्य आहे. व वाशिमची जनता सदैव चांगल्या कर्तव्याची जाण ठेवते. त्यामुळे येथुन बदली होईन गेलेल्या अधिकार्यांची वाशीमप्रती आपुलकी आजही कायम आहे.
सत्कार कार्यक्रमाला व्यापारी संघटना अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, भारिप जिल्हा नेते मधुकरराव जुमडे, पिआरपी जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, पत्रकार अजय ढवळे, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष गजाजन भोयर, भारिपचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजीव दारोकार, पदवीधर संघटना अध्यक्ष राजकुमार पडघान, रा.कॉ. सामाजीक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विनोद पट्टेबहादूर, माजी पं.स. सदस्य सिद्धार्थ खंडारे, कृषी तज्ञ हरिदास बनसोड, रा.कॉ. विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन राऊत, कवी महेंद्र ताजने, कंत्राटदार मयूर पटेल, संदेश बांडे, राहुल बलखंडे, रवी भगत, निलेश भोजने, राजरत्न पठाडे यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक अजय ढवळे यांनी तर आभार गजानन भोयर यांनी मानले.
सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा