वाशिम
उच्च व तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांची शासनाने शिष्यवृत्ती पासून दोन वर्षापासुन वंचित ठेवल्याने त्यांचे मानसिक व शैक्षणीक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्याणी शासना विरोधात एल्गार पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणास आज पासून सुरुवात केली आहे
उच्च व तंत्रशिक्षण घेणाऱ्या विमुक्त, भटके विमुक्त आणि मागासवर्गीय घटकातील विद्या र्थ्याना
चांगले उच्च शिक्षण मिळून सर्वांगीण विकास होण्यासाठी शासनाने शिष्यवृत्ती योजना सुरू केली पण दोन वर्षापासून शासनाने विध्यार्थ्याना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवले आहे हे विध्यार्थ्याना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप विध्यार्थ्याणी केला आहे. भारत सरकारने शालेय व उच्च शिक्षण घेण्यासाठी
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू केली परंतु या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने विध्यार्थ्यांचे नुकसान होत आहे .
सण 2016-17 व सण 2017-18 या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाही. याबाबत प्रशासनाला वारंवार देऊन सुद्धा दखल घेण्यात आली नाही यामुळे विध्यार्थ्यांचें शैक्षणिक मानसिक आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. शासनाविरोधात विध्यार्थ्याणी एल्गार पुकारत न्याय हक्कसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे
स।रात टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा