मालेगाव तालुक्यातील वादग्रस्त पांगरी नवघरे गावात महामानवाची प्रतिमा फेकुन अज्ञात व्यक्तीने विटंबना केल्याची घटना रात्री 10 वाजता घडली. पोलिसांत महामानवाच्या प्रतिमा विटंबना प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली
पांगरी नवघरे येथे दि 31 डिसेंबरला शंभूराजे प्रतिष्ठान च्या वतीने क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले . जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कबड्डी सामन्याच्या सुरुवातीला राष्ट्रपुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .सामना सुरू असताना अज्ञात समाज कंठकाने तीन प्रतिमेपैकी केवळ महामानवाची प्रतिमा फेकुन देऊन विटंबना केली .हा प्रकार मनोहर खडसे, ,प्रमोद ताजने,आणि पोलीस पाटील संदीप नवघरे यांच्या निदर्शनास आला. पोलीस पाटील संदीप नवघरे यांनी घटनेची माहिती मालेगाव पोलिसाना दिली . प्रतिमा विटंबना प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हाची नोंद करण्यात आली .पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा