मालेगाव तहसीलमध्ये कार्यरत कोतवाल कैलास खडसे यांनी मोटारसायकल चोरून नेताना चोरट्यास रंगेहात पकडून नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना आज दुपारी 2 वाजता घडली .
मालेगाव तहसील कार्यालयात कामानिमित्त लोक येतात चोरटे मोटारसायकलवर पाळत ठेवून मोटारसायकल चोरतात .अशा बऱ्याच चोरीच्या घटना घडल्या आहेत. मोटारसायकल चोरट्याचे मोठे रॅकेट मालेगाव शहरात सक्रिय झाले आहे .
झोडगा बु येथील कोतवाल कैलास खडसे मालेगाव तहसील कार्यालयात कर्तव्यावर आहे .आज दि 1 जानेवारीला दुपारी 2 वाजता चोरट्याने डुप्लिकेट चाबीने खडसे यांची मोटारसायकल सुरू करून पळविण्याचा प्रयत्न करतात खडसे यांनी आरडा ओरडा केला .नागरिकांच्या मदतीने चोट्यास पकडले. याबाबतची माहिती पोलिसांना देताच पोलीस त्वरित पोलीस वाहनाने घटना स्थळावर दाखल झाले .पोलिसांनी चोरट्यास मालेगाव पोलीस स्टेशनला आणले. चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे यामागे मोटारसायकल चोरट्याचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत .पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत .
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा