👉🔥🔥मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांचा आक्रोश
मालेगाव तालुक्यात हायड्रोकार्बन साठे तपासणीच्या नावाखाली उभ्यापिकात रात्री अपरात्री वाहने फिरविली जात आहेत. बोअरवेल खोदकाम हुकूमशाही पद्धतीन केले जात आहे .उभ्या पिकात बोअरवेल खोदकाम सुरू असल्याने शेतकऱ्याच्या पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे .
बाहेर राज्यातील ओएनजीसी कडे हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . .मालेगाव तालुक्यातील शिरपुर सर्कल येथे सदर खोदकाम रात्रीअपरात्री सुरू असल्याने शेतकऱ्यानी संशय व्यक्त केला आहे .एका शेतात 10 होल केले जात असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत असताना मंडळ अधिकारी व तलाठी मात्र गायब आहेत याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता संबंधित व्यक्तींनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची प्रत शेतकऱ्यांना दाखविली
पत्रात नमूद करण्यात आले आहे की संदर्भीय क्रमांक 1 पत्रकान्वये देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यामध्ये हायड्रोकार्बनचे साठे असल्याची शक्यता तपासण्याची सेसमिक डेटा संकलित करण्याचे काम ओएनजीसी कडे सुपूर्त करण्यात आले असून हे काम प्रत्यक्षात राष्ट्रीय/आंतराष्ट्रीय स्तरावरील नामवंत सर्व्हिस प्रोव्हायडर्स च्या माध्यमातून करवून घेण्यात येणार आहे . संदर्भ क्रमांक 2 अन्वये अल्फा जिओ यांनी विषयांतील प्रकरणात वाशिम जिल्ह्यात करावयाच्या सर्व्हेक्षणासाठी सहकार्य मिळण्यास विनंती केली आहे तरी आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की संदर्भीय एजन्सीला सर्व्हेक्षणासाठीं निश्चित केलेल्या ठिकाणी आवश्यकते नुसार योग्य ते सहकार्य करण्यासाठी आपल्या अधिनस्त तालुक्या अंतर्गत संबधीत गावाचे मंडळ अधिकारी /तलाठी / कोतवाल यांना आपल्या स्तरावर सूचित करण्यात यावे असा आशयाचे पत्र जिल्हाधिकारऱ्यानी तहसीलदारांना पाठविले आहे
मात्र पत्रात पिकांच्या नुकसान भरपाई बाबत कसल्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही .हुकूमशाही पद्धतीने युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची माहिती शिरपुर सर्कल मधील शेतकऱ्यांनी सम्राट टाइम्स ला दिली .याबाबत भ्रमण ध्वनिवरून मंडळ अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले .तहसीलदार कडे सुद्धा नुकसान भरपाई बाबत माहिती उपलब्ध नाही .प्रशासनच अंधारात असल्याने शेतकऱ्यांना न्याय कोण देणार? याबाबत शेतकरी संघटनेने आवाज उठवणे गरजेचे आहे
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा